Headache Cause and solution in Marathi मित्रांनो डोकेदुखी असेल तर कुठलेच काम सुचत नाही, म्हणून
आज आपण जाणून घेणार आहोत डोकेदुखी चे कारण आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय.
डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. बद्धकोष्ठ, पोटात गॅस होणे, उच्च रक्तचाप असणे,नजर कमजोर होणे, जागरण,
अति परिश्रम, अशक्तता इत्यादि. साधारण डोकेदुखी असल्यास खालील उपाय केले पाहिजेत.
![]() |
Headache Cause and solution in Marathi |
Headache Cause and solution in Marathi
१) एका बत्ताश्यावर 4 थेंब अमृतधारा टाकून खावे. 2थेंब रुमालावर आमृतधारा शिंपडून हुंगत राहावे.
२)लिंबाच्या पानांचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी थांबते.
३) चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते.
४)तिळाचे तेल 250 मि. ली. चंदनाचे तेल 10 मि.ली, दालचीनी चे तेल 10 मि.मी. आणि कापूर या
सर्वांना मिसळून बाटलीत भरून ठेवावे. 'Headache Cause and solution in Marathi' तेल डोक्यात लावल्याने डोकेदुखीत लगेच आराम मिळतो.
५) दोन चमचे आवळ्याच्या चूर्णात एक चमचा शुद्ध तूप मिसळून खावे, वरून एक पेला कोमट दूध घ्यावे.
६)रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद कापून, मिठ लावून चावून खाल्याने जुनी डोकेदुखी दूर होते.
हा प्रयोग दहा दिवस लागोपाठ करावा.
मेंदूची ताकत वाढवा
१)एक किलो गाजर किसून, चार किलो दुधात उकळावे. त्यात 250 ग्रॅम शुद्ध तूप आणि दहा बदाम टाकून भाजावे.
आणि काचेच्या भांड्यात भरून ठेवावे. रोज 50 ग्रॅम खाऊन वरून दूध प्यावे. एक महिना लागोपाठ घेतल्याने मेंदूस
ताकत येते.
२)एक सफरचंद आगीत भाजून पाण्यात कळशीत सोडावे. हे पाणी गाळून प्यावे.
३) धणे, खसखस समप्रमाणात. घेऊन कुटून घ्यावे व बारीक चूर्ण करावे. तेवढ्याच प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात
मिसळावी एक - एक चमचा चूर्ण सकाळी 9 वाजता व जेवणा नंतर रात्री 9 वाजता कोमट गोड दुधा बरोबर किंवा पाण्या
बरोबर नियम पूर्वक घ्यावे.Headache Cause and solution in Marathi यामुळे स्मरणशक्ती, नेत्रज्योती वाढते आणि गाढ झोप लागते.
चकरा येणे
१) कोरडा आवळा सहा ग्रॅम, धणे सहा ग्रॅम घेऊन त्यांचे कूट करावे रात्री मातीच्या भांड्यात पाव लीटर पाण्यात भिजवून
ठेवावे, सकाळी मळून व गाळून दोन चमचे वाटलेली खडीसाखर मिसळून प्यायल्याने चक्कर येणे थांबते.
२)पोटाच्या गडबडीमुळे जर चक्कर येत असेलतर अर्धा ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने आराम वाटतो.
३)25 ग्रॅम मनुक्का शुद्ध तुपात परतून, "Headache Cause and solution in Marathi"सेंधा मिठ टाकून खाल्याने चक्कर येणे थांबते.
४)उन्हाळ्यात चक्कर येत असतील तर आवळ्याचे सरबत घेतल्याने आराम वाटतो.
तर मित्रांनो अश्याप्रकरे आपण डोकेदुखी वर घरगुती उपाय करू शकता, जर हे उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले असतील
तर इतरांना शेअर करा.
0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.