डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट,Dr Babasaheb Ambedkar information in Marathi

 Dr Babasaheb Ambedkar 

•१८९१ महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म. (१४ एप्रिल)

•१९०७: डॉ. आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

• १९०८: रमाबाई वलंगकर यांच्यासोबत विवाह.

•१९१०: इन्टरमीडीएट परीक्षा उत्तीर्ण.

• १९१२: बी. ए. परीक्षा उत्तीर्ण.

•१९१३: वडील सुभेदार रामजी यांचे निधन. ( २ फेब्रुवारी)

• १९१३: सयाजीराव गायकवाड यांनी विदेशात अध्ययनासाठी शिष्यवृत्ती बहाल केली. ( १ जून )

•१९१३: उच्च शिक्षणाकरीता न्यूयॉर्क ( अमेरिका ) येथे रवाना.

• १९१५: 'Ancient Indian commerce' या प्रबंधावर एम. ए. ची उपाधी बहाल.

• १९१६: National dividend of India A historical and analytical study प्रबंध कोलंबिया

विद्यापीठाद्वारे स्वीकृत. 'Dr Babasaheb Ambedkar information in Marathi'

• १९१६: PhD पदवी बहाल.

Dr Babasaheb Ambedkar information in Marathi
Dr Babasaheb Ambedkar information in Marathi


Dr Babasaheb Ambedkar

• १९१८: Sydenham कॉलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती.( ११ नोव्हेंबर)
• १९२०: राजर्षि शाहू महाराज यांच्या साहाय्याने ' मूकनायक ' पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित. ( ३१ जाने )
• १९२०: माणगाव ( कोल्हापूर ) येथे बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद. ( १ मार्च ) 
• १९२०: अखिल भारतीय बहिष्कृत परिषद, नागपूर ( १ मे ) 
• १९२२: बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण.
• १९२३: डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी बहाल.
• १९२४: ' बहिष्कृत हित्कारिनी सभा ' ची स्थापना, मुंबई. ( २० जुलै )
• १९२६: ' राजरत्न ' या मुलाचे निधन. ( जुलै )
•१९२७: कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, महाड . ( १९ मार्च )
•१९२७: ' बहिष्कृत भारत ' पाक्षिकाचे प्रकाशन. ( ३ एप्रिल )

Dr Babasaheb Ambedkar

• १९२७: मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणून निवड.
• १९२७: ' समाज समता संघ' ची स्थापना. ( ४ सप्टेंबर )
• १९२७: डॉ. आंबेडकरांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांचे निधन. ( १२ नोव्हेंबर )
• १९२७: अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्याग्रह. ( १३ नोव्हेंबर )
•१९१७: महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन. ( २५ डिसेंबर )
• १९२८: मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यापक. ( जुने )
•१९२८: ' समता ' पक्षिकाचा आरंभ. ( २९ जुने )
•१९२८: ' सायमन कमिशन ' पुढे साक्ष. ( २३ ऑक्टोबर )
•१९२९: अस्पृश्यांसाठी ३३ टक्के आरक्षण ठेवण्याबाबत मुंबई विधिमंडळात भाषण.
•१९३०: काळाराम मंदिर, नाशिक सत्याग्रह प्रारंभ. ( ३ मार्च )
•१९३०: लंडन येथे गोलमेज परिषदेसाठी मुंबईहून रवाना. ( २ ऑक्टोबर )
•१९३०: गोलमेज परिषदेत अस्पृश्यांची बाजू ठामपणे मांडली. ( नोव्हेंबर )
•१९३०: ' जनता ' साप्ताहिकाचा आरंभ. ( २४ नोव्हेंबर ) 
•१९३१: मणीभवन, मुंबई येथे गांधीजींसोबत पहिली भेट. ( १४ ऑगस्ट )
•१९३१: अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबाबत गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध. ( ८ ऑक्टोबर )
•१९३१: गांधी - आंबेडकर - पंचम जॉर्ज यांची भेट. ( २६ नोव्हेंबर )
•१९३२: पुणे करारावर स्वाक्षरी. ( २४ सप्टेंबर )
•१९३५: पत्नी रमाबाई यांचे निधन. ( २७ मे )Dr Babasaheb Ambedkar information in Marathi
•१९३५: मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती. ( २ जून )
१९३५: येवला, ' हिंदू म्हणून जन्माला आलो , पण हिंदू म्हणून मरणार नाही. डॉ आंबेडकरांची
धर्मांतराची घोषणा. ( १३ ऑक्टोबर )


Dr Babasaheb Ambedkar 

• १९३६: ' जातीप्रथेचे उन्मुलन ' भाषण प्रकाशित . ( मे )
•१९३६: ' मुक्ती कोन पथे ' विख्यात भाषण , मुंबई . ( ३१ मे )
•१९३६: स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. ( १५ ऑगस्ट )
• १९३७: मुंबई असेम्ब्ली निवडणूक, डॉ आंबेडकर विजयी. ( १७ फेब्रुवारी )
• १९३७: कोकणातील ' खोती ' नष्ट करण्याकरिता मुंबई विधिमंडळात बिल मांडले. ( १७ सप्टेंबर )
• १९३८: पंढरपूर, मातंग परिषदेतर्फे मानपत्र अर्पण. ( ४ जानेवारी )
• १९३८: मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद. ( १२ - १३ फेब्रुवारी )
• १९३८: मुंबई विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून राजीनामा. ( मे )
• १९३८: औद्योगिक कल्हाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. ( सप्टेंबर )
• १९३८: स्वतंत्र मजूर पक्षातर्फे सत्याग्रह. ( ७ नोव्हेंबर )
• १९३९: महाड, शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद - काँग्रेसच्या शेतकरी - विरोधी धोरणावर टीका. ( जानेवारी )
• १९४०: सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत भेट , मुंबई ( २२ जुने )
• १९४०: ' थॉटस ऑन पाकिस्तान ' ग्रंथाचे प्रकाशन.
•१९४२: अखिल भारतीय शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना. ( एप्रिल )
• १९४२: भारतीय दालित वर्ग परिषद , नागपूर येथे हजार. ( १९ जुलै )
• १९४२: मजूर मंत्री म्हणून निवड.
• १९४३: पुणे येथे विख्यात भाषण, रानडे , गांधी आणि जिन्ना. ( १९ जानेवारी )
•१९४५: ' काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्याप्रती काय केले ' ग्रंथ प्रकाशित . ( जुने )
• १९४६: मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना. ( २० जून )
• १९४६: ' शूद्र पूर्वी कोन होते? ' हा ग्रंथ प्रकाशित.
• १९४६: भारताला कोणतीही शक्ती एकात्मक होण्यापासून परावृत्त करो शकत नाही . संविधान सभेत भाषण. ( ऑगस्ट )
•१९४७: भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश . ( ऑगस्ट ) 
• १९४७: संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवड. ( २९ ऑगिस्ट )
• १९४८: डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत विवाह. ( १५ एप्रिल )
• १९४८: ' दी अनटचेबल्स ' ग्रंथ प्रकाशित. ( ऑक्टोबर )
• १९४८: सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांच्यासोबत भेट. ( सप्टेंबर )
• १९४८: घटनेचा मसुदा घटना समितीसमोर ठेवला. ( ४ नोव्हेंबर )
• १९४९: घटना समितीत देशभक्तीने ओथंबलेले समारोपीय भाषण. ( २५ नोव्हेंबर )
•१९४९: घटना समितीने घटना स्वीकार केली. ( २६ नोव्हेंबर )
• १९५०: ' बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य ' लेख महाबोधी संस्थेच्या मासिकात प्रसिद्ध ( मे )
• १९५०: कोलंबोत विश्व बौद्ध परिषदेला उपस्थित. ( २५ मे )
• १९५०: औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन. ( १९ जून )
• १९५१: लोकप्रतिनिधित्व विधेयक लोकसभेपुढे मांडले. ( मे )
• १९५१: ' हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती ' हा लेख महाबोधी मासिकांमध्ये प्रकाशित. ( सप्टेंबर )
• १९५१: हिंदू कोड बिल व मागासवर्गयांच्या अरक्षणाबाबत मंत्रीपरिषदेचा राजीनामा . ( २७ सप्टेंबर )
• १९५२: प्रथम सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभव. ( जानेवारी )
• १९५२: राज्यसभे साठी निवड. ( मार्च )"Dr Babasaheb Ambedkar information in Marathi"
• १९५२: कोलंबिया विद्यापीठातर्फे ' डॉक्टर ऑफ लाँज् ' ही पदवी अर्पण. ( ५ जून )
• १९५३: हैद्राबाद , उस्मानिया विद्यापीठातर्फे ' डॉक्टर ऑफ लिटरेचर ' पदवी अर्पण. ( १२ जानेवारी )
• १९५४: ' महात्मा फुले ' बोलपट चित्रपाटाच्या मुहूर्त समारंभास उपस्थित. ( ३० जानेवारी )
• १९५४: भंडारा पोटनिवणुकीमध्ये पराभव.( मे )
• १९५४: आकाशवाणीवर ' माझे वैयक्तिक तत्वज्ञान' भाषण. ( ३ ऑक्टोबर )
• १९५४: रंगून, तिसऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला उपस्थित. ( डिसेंबर )
• १९५५: भारतीय बौद्ध महासभा स्थापित . ( ४ मे )
• १९५६: मुंबई ही महाराष्ट्राची आहे, अशी ताकीद भारत सरकारला दिली. ( ४ फेब्रुवारी )
• १९५६: नरे पार्क, मुंबई येथे ' ऑक्टोबर महिन्यात मी बौद्ध धम्माची दीक्षा घेईन ' अशी घोषणा केली. ( २४ मे )
• १९५६: नागपूर येथे पूज्य भंते महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते पत्नीसोबत धम्मदीक्षा घेतली व नंतर
आपल्या ५ लाख अस्पृश्य बंधूंना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ( १४ ऑक्टोबर )
• १९५६: ' बौद्ध धम्म हा स्वीकारला ' याविषयी सकाळी अभूतपूर्व भाषण व नागपूर म्यूनिसीपालटीतर्फे 
संध्याकाळी मानपत्र अर्पण . ( १५ ऑक्टोबर )
• १९५६: चंद्रपूर येथे २ लाख अस्पृश्य बंधूंना धम्मदीक्षा दिली. ( १६ ऑक्टोबर )
• १९५६: काठमांडू, नेपाल येथे जागतिक बौद्ध परिषदेत ' बुद्ध आणि कार्ल मार्क्स ' हे अभुतपुर्व भाषण दिले.
• दिल्ली येथे त्यांच्या निवास्थानी महापरिनिर्वाण. ( ६ डिसेंबर )
• १९५६: मुंबई येथे दादर चौपाटीच्या किनाऱ्यावर १० लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार 
अंतिम संस्कार . ( ७ डिसेंबर )




Post a Comment

0 Comments