संत कबीर म्हणजे एक महान भारतीय संत आणि कवी, ज्याच्या शास्त्रीय नावाने संत कबीरदास म्हणजे आपल्या भारतीय साहित्यातील एक महत्त्वाचे स्थान आहे. संत कबीर भारतीय संस्कृतीच्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे आणि त्याच्या कायद्यांच्या भक्तिसंबंधीत अभिप्रेतांच्या आशयांच्या रूपांतरास विशेष महत्त्व आहे.
8 June 2023
त्यांच्या काव्यातील बोली संपूर्ण भारतीय लोकांच्या तुच्छापणाचा, व्यभिचाराचा, धोखेबाजीचा व पाखंडाचा त्यांच्याकडे प्रहार करणारा आहे. त्याच्या भक्तिप्रधान कवितांतील वचन सामाजिक, धार्मिक व आंतर्जागृतीच्या प्रश्नांचा एक अभिप्रेत दिसतो.
यांच्या लोकप्रिय अभंगांच्या भाषेमध्ये ज्ञान, अंतर्द्रष्टी, साहित्यिकता व अनुभव एकत्रीत आहे
वर्णव्यवस्थेवर चढाई.
कबिरांनी माणसाला आंतरिक बंधनातून मुक्त करून त्याला
सर्वशक्तिमान बनविण्यासाठी आपल्या काव्याद्वारे मार्गदर्शन
केले. परंतु माणसासाठी एवढेच पर्याप्त नाही.'Sant kabir'
त्याला जोपर्यंत सामाजिक बंधनातून मुक्त करीत नाही तोपर्यंत
खऱ्या अर्थाने तो मुक्त होत नाही. भारतीय संदर्भात असा स्वतंत्र
माणूस घडविण्यासाठी येथील समाजव्यवस्थेचा कबिरांनी मूलगामी
विचार केला. ज्या सामाजिक बंधनांनी माणसाच्या पायात दास्यश्रृंखला
बांधल्या आहेत, त्या तोडून माणसाला त्यातून मुक्त करण्यासाठी कबिरांनी
अविश्रांत प्रयत्न केले.
माणसामानसात भेद निर्माण करणाऱ्या समाजव्यवस्थेवर त्यांनी
आपल्या वाणीने कठोर हल्ला चढविला. सामाजिक जोखडातून
बहुसंख्यक सामाजिकदृष्टया शिकार झालेल्या लोकांना मुक्त
करण्यासाठी व त्यांच्यात प्रज्ञेची चेतना निर्माण करण्यासाठी
त्यांनी जे कार्य केले ते निश्चितच ऐतिहासिक आणि मानवी समाज
घडविण्यासाठी क्रांतिकारक स्वरूपाचे आहे.
![]() |
Social media |
वर्णव्यवस्थेवर चढाई.
भारतीय समाव्यवस्थेत हिंदू धर्माने चार वर्ण निर्माण केले. या चार
वर्णाची निर्मिती ब्राह्मण या एका वर्णाने केली. त्यांनी आपल्या सेवेसाठी
क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अशा वर्णाची निर्मिती केली. ही वर्णनिर्मिती मानवनिर्मित
नसून इश्र्वरनिर्मिती आहे.
असा आभास जनमानसात निर्माण करण्यासाठी त्यांनी शास्त्र
पुराणांची रचना केली. प्रत्येक मनुष्य हा पूर्वजन्माच्या संचितानुसार या वर्णात
जन्म घेत असतो. कुणालाही आपली वर्णाची मर्यादा तोडण्याचा अधिकार नाही.
त्यामुळे माणूस कर्माने मोठा न ठरता जन्मानेच मोठा ठरावा, असा हा
कर्मविपाकाचा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारात कार्यरत होता. कुणालाही आपल्या
कर्मानुसार, त्यांच्यात क्षमता असूनही,Sant kabir
दुसऱ्या वर्णात प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे
बहुसंख्य मनुष्याच्या प्रगतीला अडसर निर्माण होऊन त्यांची
कोंडी झाली होती. अशा या समाजविघातक वर्णव्यवस्थेवर
कबिरांनी चौफेर हल्ला चढविला. या विषमताधीष्ठत व्यवस्थेचा
पुरस्कार करणारे स्मृती, शास्त्र, धर्मग्रंथ, हे प्रमाणित नसल्यामुळे
अस्वीकाराह आहेत. असे त्यांनी घोषित केले. वर्ण, आश्रम, या गोष्टी
मानवांना अपकारक आहेत. त्यामुळे त्यांच्या मर्यादांचे पालन करण्याची
काही गरज नाही, असे त्यांनी सुचविले. कबिरांचे आपल्या ' सहजभक्ती ' द्वारे एक संस्कृती, एक समाज
एक सभ्यता निर्माण करण्याचे ध्येय होते. त्यांच्या या समानतेच्या
तत्वाला आणि ध्येयाला वर्णाश्रम - व्यवस्था सर्वात मोठा अडसर
असल्यामुळे कबिरांनी त्यावर टीका करणे अपरिहार्य होते.
पंच बरन दस दुहिए गाई, एक दूध देखों पति आई|
कहै कबीर ससा करि दूरि, त्रिभूननाथ रहवा भरपरि||
याचा अर्थ असा की, पाच रंगाच्या विभिन्न दहा गाईचे दूध काढले
तरी दुधाचा रंग एकच असतो. तो गायीच्या रंगा प्रमाणे
कधीच नसतो. अशाप्रकारे भिन्न भिन्न नामरूप असले तरी त्यात
एक समानतेचे तत्व असते. हा कबिरांचा हितोपदेश
वर्णव्यवस्थेचा निः पात करणारा असून समतेचे तत्व प्रतिपादन
करणारा आहे. यातूनच त्यांनी आपल्या अनुयायात आणि अन्य
लोकांत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. हे करतानाच मानव
समाजाला कलंकित करणारी ज्यांनी वर्णव्यवस्था निर्माण केली.
त्यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. त्या पुरोहित समाजाविषयी कबीर म्हणतात,
पांडे बुझि पियहु तुम पानी|
जेहि मटिया के घर मंह बैठे, तामे सृष्टी समानी|
छपन कोटि जादव जंह भीजे, मुनि जन सहन अठासी|
पैग पैग पैगम्बर गाडे, सो सब सरि भो मा|
तेहि मटिया के भांडे पांडे, बुझि पियहू तुम पानी|
मच्छ कच्छ घरियार बियाने, रुधिर नीर जल भरिया|
नदिया नीर नरक बहि आवै, पसु मानुष सब सरिया|
हाड झरी झरि गुद गलीगल, दूध कहां ते आया|
सो लै पांडे जेंवन बैठे, मटियहि छूति लगाया|
बैद कितेब छांडि देहु पांडे, ई सब मन के भर्मा|
कहैं कबीर सुनो हो पांडे, ई सब तुम्हरे कर्मा|
अर्थात
हे पुरोहितांनो! तुम्ही जात विचारून पाणी प्राशन करता परंतु
आचरणाचा कधी विचार करीत नाही. तुम्ही ज्या मातीच्या घरात
बसला आहात त्या मातीत सृष्टी वसली आहे. प्राण्यांचे शरीर या
पृथ्वीत सडून कुजून मिसळले आहे. त्यात मातीने तुमचे घर बांधले
असल्यामुळे या अपवित्र घरात तुम्ही निवास करायला नको.
ज्या भूमीत सर्वाचे शरीर मिसळले आहे, त्याच भूमीच्या
परमाणुपासून तुमच्या शरीराची निर्मिती झाली आहे. त्यामुळे
तुम्ही अपवित्र असतानाही दुसऱ्यांना विचारून पाणी प्राशन का
करता? ज्या नदीत मासे, कासव आदी जलप्राण्यांची निर्मिती
होते, त्यांच्या घाणीमुळे पाणी दूषित होते आणि माणसाचे प्रेत
सडून कुजून जलमय होते. नदीत असा नरक वाहत असताना ते
पाणी सर्वजण पितात. त्या पाण्याला माणसाचा स्पर्श झाला तर
ते अपवित्र झाले असे मानणे अव्यवहर्य आहे. याशिवाय हाडमांस
व कोवळ्या मांसातून जे दूध निघते त्याचा तुम्ही भोजनात वापर करता
परंतु हीन जातीच्या लोकांचा त्याला स्पर्श
झाला तरी ते तुम्हाला चालत नाही. ज्या मातीच्या भांड्याला तुम्ही स्वच्छ
करू शकता, त्यातील पाण्याचा तुम्हाला विटाळ कसा होईल? शेवटी पुरोहितांनो!
ज्या वेदांत विचारांचे तुम्ही"Sant kabir"
वहन करीत आहात, ते तुमच्या स्वार्थाचे प्रतिफल आहे, हे
लक्षात घ्या आणि त्याचा तुम्ही त्याग करा.
0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.