या माशाची सुगंधी ‘उलटी’आहे करोडो रुपयांची, कारण जाणून घ्या!

14 may 2023

व्हेल (whale fish) प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही ‘स्पर्म’ (whale sperm) व्हेलच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व असून तिला भरमसाठ दर मिळून कोट्यवधीची कमाई मिळते. 

Sperm whale 


परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी नैसर्गिक तत्त्व म्हणून ती वापरतात. त्याचा आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना दर अधिक मिळतो. यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते.   या उलटीला मिळणार्‍या कोट्यवधीच्या किमतीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मत्स्यक्षेत्रातील अभ्यासकांकडून विविध माहिती संकलित केली आहे. जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते. व्हेल माशामध्ये दात नसलेले आणि दात असलेले अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. उलटी उपयुक्त असलेला ‘स्पर्म व्हेल’ हा दात असलेल्या प्रजातीतील आहे.

Whale
Maharashtranews369


साधारणत: व्हेल हा समुद्र किनार्‍यापासून खूप दूर असतो. उलटीसारखा हा भाग किनार्‍यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. याचे वजन 50 किलोपर्यंत असते असे अभ्यासकांचे मत आहे. उलटी कशी ओळखतात स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारख किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात.
Social media
Social media 

गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते. स्पर्म व्हेल संरक्षित घटक खोल समुद्रात सापडणारा ‘स्पर्म’ व्हेल हा संरक्षित घटक आहे. हा मासा सीआयटीइएस (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे स्पर्म व्हेलची शिकार किंवा त्यांच्याशी निगडीत कोणत्याही घटकाची विक्री करण्यास बंदी आहे.

Social media
Social media
 
 
 व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो. शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अ‍ॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचन नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते.
 उलटी किनारी येण्यासाठी वर्षही लागते उलटीचे वजन 50 किलोपर्यंत असते 


याची इतकी किंमत का आहे?
कारण हा पदार्थ फार दुर्मिळ आहे. तो सहज सापडत नाही. क्वचित सापडतो. म्हणून तो किंमती आहे. यापासून उत्तम दर्जाची, टिकाऊ वासाची अत्तरे बनतात. ही अत्तरे खूप महागडी असतात.

शिवाय हे फ्लोटिंग सोने माणसाच्या हातात पडण्यापूर्वी अनेक दशके महासागरात खूप आत आणि खूप खोलवर पडून राहिलेले असते. त्यानंतर ते क्वचित कधीतरी किनाऱ्याला लागते.