गौतम बुद्धांचे कुळ
22 may 2023,
कुळ
१. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते.
२. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहानमोठ्या राज्यांत विभागला गेला होता. त्यांपैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर
काहींवर एका राजाची सत्ता नव्हती.
३. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती. त्याची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स,
कुरू, पांचाळ, मत्स्य, सौरसेना, अश्मक, अवंती, गांधार, आणि
कंबोज ही होत.
![]() |
Social media |
४. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत -
कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे
लीच्छवी, मिथेलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बळी,
रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी
मिसुमारगिरी होती ते भग.
५. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत
व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना ' संघ ' किंवा
' गणराज्य ' असे म्हणत असत.
६. कल्पिवस्तू येथील शाक्यांच्या शासनपद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की, त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही.
७. तथापि, हे मात्र निश्चित की, शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक
राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होते.
८. अशाप्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला
' राजा ' अशी संज्ञा होती.
९. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची
पाळी शुद्धोधनाची होती.
१०. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते.
ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या
राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश
मिळवले.
११. कोशलाधिपतीच्या अधिस्त्तेमुळे शक्यांना कोशल राजाच्या
अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते.
१२. तत्कालीन राज्यात कोशलराज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य
होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा
पसेनदी ( प्रसेनजित ) व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ
गौतमाचे समकालीन होते.
पूर्वज
![]() |
Social media |
जन्म
ब्राह्मणांसाठी उच्चासंने मांडली.
१४. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्याचांदीने भरून घृतमधूयुक्त
व साखरमिश्रीत दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन संतुष्ट केले.
याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादींचे दान दिले.
१५. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महमायेला पडलेले
स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, " या स्वप्नाचा अर्थ मला
सांगा.
१६. " राजा, चिंता करू नकोस, " ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की, जर तो संसारात राहिला तर तो सर्वभोम
सम्राट होईल पण संसारत्याग करून जर तो सन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंध: कार नाहीसा करणारा भगवान बुद्ध
होईल.
१७. पात्रांतील तेलाप्रमाने महामायेने दहा महिने बोधिस्त्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त
केली. आपल्या पतीला ती म्हणाली, " माझ्या पित्याच्या
देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते".
१८. " तुझ्या इच्छेप्रमाणे होईल." राजाने उत्तर दिले. सोन्याच्या
पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला
तिच्या पित्याच्या घरी पाठविले.
१९. देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच
पुष्पविहिरीत अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून
महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय.
२०. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय
अशा चित्रलता वणाप्रमाने किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या
स्वागता साठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते.
२१. बुंध्या पासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुला फळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र
आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे
पक्षिगण मुंजळ स्वरालाप काढीत होते.
२२. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेला मनात येथे थांबून काही काळ क्रिडाविहर करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून
तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्ष्च्या
कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले.
२३. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर
शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळुकिने वर खाली हेलावत असलेल्या पाहून
महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले.
२४. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी
खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्याच वड्यावर उभी
राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली , आणि अश्याप्रकरे हाल्यांमुळे तिला प्रसूतीच्या विदना होऊ लागल्या.
शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला
जन्म दिला.
२५. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.
२६. शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली
होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्रप्राप्ती
झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हार्शोल्यासाने थाटामाटात साजरा
केला.
२७. पुत्रजन्माच्या या वेळी कपिलवस्तुचे राजपद भूष विण्याची
पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले.
0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.