बालपण आणि शिक्षण
25 may 2023
Gautam Buddha
१. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यंतील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की, मुलाला ' अभया ' या ग्राम देवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजेत.
२. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले.
३. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. जेव्हा त्याला समजले की, आपल्याला देवळात नेले जात आहे, तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानूसार तो देवळात गेला.
 |
Social media |
४. वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थच्या विद्याभयासास सुरुवात झाली.'Gautam Buddha'
५. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरू झाले.
६. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदीच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे, आणि उपनिषदे या सर्वांत पारंगत होते. शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरू.
 |
Social media |
७. त्यांच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन - शास्त्रचे आत्मसात केली.
८. याशिवाय त्याने आलारकालामचा शिष्य भारद्वाज याजकडून
ध्यानधारणेची विद्या संपादली. भारद्वाजाचा आश्रम कापिलवस्तू
येथे होता.
सुरुवातीची लक्षणे
१. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या
ठिकाणी त्याला काही काम नसे त्या वेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा यत्न करीत बसे.
 |
Social media |
२. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या
जात असताना शत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते.
३. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या
पुरुषतत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून
होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे.
४. सिद्धार्थ दयाशिल प्रवृत्तीचा होता, माणसानं माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे.
५. एकदा तो आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रानिशी
अंग भाजून काढणाऱ्या कढत उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे, इत्यादी कामे करीत असलेले मजूर पहिले.
६. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला.Gautam Buddha
७. तो आपल्या मित्रांना म्हणाला, " एका माणसाने दुसऱ्याची
पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व
त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे
बरोबर असू शकेल?"
८. त्यांच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना. कारण ते
जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते, मजुराचा
जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि
आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची
इतिकर्तव्यता आहे.
९. शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा
करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी
प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे
भाग पडत असे.
१०. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर
धरीत असे.
११. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी
तिरस्कार केला नाही.
Gautam Buddha
१२. तो शत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुविद्येचे
आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु
दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे.
१३. शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, " तुला वाघांची भीती वाटते काय" तेव्हा तो उत्तर देई, " मला माहित आहे, तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरीण आणि सासे यांच्या सारख्या
निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात.
१४. " निदान तुझे मित्र किती बिनचूक निशानबाजी करतात हे
पाहण्यासाठी तरी तू ये" त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ
अशाप्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, " मला
निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही".
१५. सिद्धार्थाच्या ह्या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय
चिंताग्रस्त होत असे.
१६. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की, तू
शत्रिय आहेस, लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच
युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते. कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे शत्रियांचे युद्धविद्येचे
शिक्षण घेण्याचे एक शेत्र आहे.
१७. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारात असे, " पण आई,
शत्रियांना लढावेतरी का लागते?. आणि गौतमी उत्तर देई,
तो त्यांचा धर्म आहे म्हणून.
१८. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमिला
विचारी, मला असे सांग की, माणसाला मारणे माणसाचा धर्म
कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर देई, " ही प्रवृत्ती एखाद्या
संन्याशाला योग्य आहे. पण शत्रियाने लढलेच पाहिजेत. जर ते
लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोन करील?
१९. पण आई, जर सगळे शात्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले
तर हिंसा न करता ते आपल्या रांज्यांचे रक्षण करू शकणार नाहीत काय? यावर गौतमी निरुत्तर होई.
२०. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे
आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एकाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. " मी सुखी व्हावी, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणिमात्र सुखी व्हावेत, अशाप्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी
तो त्यांना उपदेश करी.
२१. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत.
२२. ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत उलट त्यांच्या दृष्टपुढे शिकारीची हरिने किंवा
गोड पदार्थ येत असत.
२३. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास
आवडत नसे. तो शत्रीयाच्या जीवनाच्या सर्वथा विरूद्ध आहे,
असे त्यांना वाटे."Gautam Buddha"
२४. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील
मनुष्यमात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होत, यावर सिद्धार्थाचा
विश्वास होता, या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, " आपण
जेव्हा प्राणिमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व
असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून
विगले करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना
मनुष्यप्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यांवर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्त्र पशुंचा द्वेष करतो.
२५. ही भेदशेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा
आपल्या जिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो
तेव्हाच हे करू शकतो. अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती .
२६. त्याचे बालपण परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते.
0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.