का गौतम बुद्धांनी सोडले आपले धन,सुखसंपत्ती, व राजमहाल ? हे आहे सत्य.
3 June 2023
शाक्या संघात प्रवेश
१. शाक्यांचा एक संघ होता. वयाची वीस वर्षे झाल्यावर प्रत्येक
शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे.
२. सिद्धार्थ गौतमाला वीस वर्षे पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा
घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते.
३. शाक्यांचे एक सभागृह होते. त्याला ते ' संथागार ' म्हणत.
ते कपिलवस्तु नगरात होते. संघाच्या सभाही ह्याच संथागारात
होत असत.
४. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने
शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलाविण्यास सांगितले.
५. त्यानुसार कपिलवस्तु येथील शाक्यांच्या संथागारात संघाची
सभा झाली.
 |
Social media |
६. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने
संघाच्या सभेत ठराव मांडला.
७. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला.
संघाला उद्देशून त्याने पुढीप्रमाणे भाषण केले. " शाक्य वंशातील
शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद
होऊ इच्छितो. त्याचे वय वीस वर्षांचे असून तो सर्व दृष्टींनी ह्या
संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला ह्या संघाचे
सदस्य करून घ्यावें, असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे
की, या प्रस्तावाच्या विरूद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे.
८. या सुचनेविरुद्धा कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, " मी दुसऱ्यांदा सांगतो की, जे कोणी या ठरावाच्या
विरूद्ध असतील त्यांनी बोलावे.'Gautam Buddha'
९. ठरावाविरूद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की, जे कोणी ह्या ठरावाविरूद्ध असतील त्यांनी बोलावे.
१०. तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरूद्ध बोलले नाही.
११. शाक्यांचा असा नियम होता की, एखाद्या ठरावाशिवाय
त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही
ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर
करता येत नव्हते.
१२. सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत
झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा
सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले.
१३. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला
आपल्या जागी उभे रहावयास सांगितले.
१४. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, " तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? "होय महाराज. सिद्धार्थ उत्तरला.
१५. " संघाने सभासदत्वाची बंधने तुला ठाउक आहेत काय?
" नाही महाराज! पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल.
" सिद्धार्थ म्हणाला.
१६. पुरोहिताने म्हटले, " प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची
कर्तव्ये काय आहेत ती सांगतो, असे म्हणून तो पुरोहित त्याला
संघाच्या सभासदाचे एक कर्तव्य सांगू लागला.
१) " तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमनधनपूर्वक केले पाहिजे.
२) संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहत कामा नये.
३) कोणत्याही शाक्याच्या वर्तनाला तुला दिसून येणारे दोष तू
कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे
बोलून दाखविले पाहिजेत.
४) तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये. परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे. अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगीतले पाहिजे.
१७. पुरोहित पुढे म्हणाला, " यानंतर मी तुला संघाच्या
सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो -
१) " तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस.
२) तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस.
३) तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस.
४) तू खोटी साक्ष दिल्यास तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू
संघाचा सभासद राहू शकणार नाहीस.
१८. सिद्धार्थाने म्हटले, " महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतार्थ
आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयाशहीत पालन
करण्याचा अधिकाअधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो.
संघाशी संघर्ष
१. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर
आठ वर्षे लोटली.
२. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या
कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श
असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता.
३. तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी
घटना घडली की, जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक
दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती
ठरली.
४. या दुः खांतिकेचा आरंभ असा आहे.
५. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते.
रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती.
 |
Social media |
६. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या
शेतीकरिता वापरीत असे. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व
किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे.
या वादाची परिणता भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही
होत असे. Gautam Buddha
७. सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्षे झाली. त्या वर्षी शाक्यांच्या
व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष
झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या.
८. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिय यांना मिळाली
तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे
त्यांना वाटले.
९. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकरण्याच्या
प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलविले.
१०. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, " आपल्या
लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना
माघार घ्यावी लागली आहे. अशाप्रकारच्या आक्रमणांची कृत्ये
यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही
ती आजपर्यंत सहन केली आहेत. पण मार्ग म्हणजे कोलियांच्या
विरूद्ध युद्ध पुकरणे हाच होय. कोलियांच्या विरूद्ध संघाने युद्ध
पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी
बोलावे.
११. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला
" या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत
नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. दुसऱ्या
युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला
त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसरा जिंकतो त्याला
जिंकणारी दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो.
१२. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध
युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम
दोष कुणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक
चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले
असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपणसुद्धा निर्दोष
नाहीत हे सिद्ध होते.
१३. सेनापतीने उत्तर दिले, " होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण
केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की, प्रथम पाणी
घेण्याची पाळी ती आपलीच होती.
१४. सिद्धार्थ गौतम म्हणाला, " यावरून स्पष्ट होते की, आपण
दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की,
आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी
दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी
मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे
भांडण मिटवावे.
१५. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले. परंतु
सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, ' माझी खात्री
आहे की, कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन
केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही.
१६. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली.
सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली.
ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य
झाल्याचे जाहीर करण्यात आले.
१७. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतः चा प्रस्ताव मतास टाकला.
त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला,
" हा प्रस्ताव मान्य करू नये, अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा
संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही.
१८. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की,
" शत्रिय लोक युद्धात आपला आणि
परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरीता त्यांनी
आपल्या सख्ख्या भावाशी देखील लढले पाहिजे.
११. " यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे, युद्ध करणे हा
शत्रियांचा धर्म आहे, व्यापार करणे वैश्यांचा धर्म आहे, तर सेवा
चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म
पालन करण्यात पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे.
२०. सिद्धार्थाने उत्तर दिले, " धर्म याचा अर्थ मी असा समजतो की,
वैराने वैर शमत नाही. वैरावर प्रेमानेच मात करता येते.
२१. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, " या तत्वज्ञानाच्या चर्चेत
शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की,
सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय
म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊ
या.
२२. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार
मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.
देशत्यागाची तयारी
१. दुसरे दिवशी, युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या
आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य
संघाची दुसरी सभा बोलाविली.
२. संघाची सभा भरल्यावर, कोलियांशी युद्ध करण्यासाठी २० ते २५
वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे, अशी घोषणा
करण्यास संघाने मला परवानगी द्यावी, असा सेनापतीने ठराव मांडला.
३. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की, आपणास पाठिंबा देणारे मौन धारण
करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला,
" मित्रहो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे
परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की, सैन्यभरतीच्या तुमच्या
निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही
आणि मी युद्धात भाग घेणार नाही.
४. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, " संघाचा सदस्य
होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर, तू त्यांपैकी एका जरी
शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल.
५. सिद्धार्थाने उत्तर दिलं. " होय मी माझ्या तनमनधनाने शाक्यांचे हित्संरक्षण
करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला
वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा?
६. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, " तुझे
हे भाषणकौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या
निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की,
कोशल राजाच्या अनुज्ञेवाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा
देशत्यागाची सिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यांपैकी कोणतीही एक
शिक्षा तुला संघाने जरी फर्मावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती
देणार नाही.
७. " पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवल दुसरे मार्ग आहेत.
संघ तुझ्या कुटुंबावर साजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या
कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता राजाची अनुमती मिळवण्याची
संघाला आवश्यकता नाही.
८. कोलीयांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे
दुष्य परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला तीन
पर्याय विचारात घ्यावें लागले. एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे.
दुसरा, देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे, आणि तिसरा, आपल्या
कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ
देण्यास तयार होणे.
९. पहिला पर्याय न स्वीकारन्याबद्दल त्याचा निर्धार होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा
विचारच त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य
वाटला.
१०. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, " कृपा करून माझ्या कुटुंबीयांना
शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका.
त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची
उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची
शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहंताची वा देशत्यागाची यांपैकी तुम्हाला
योग्य वाटेल ती शिक्षा द्या, मी ती खुशीने सविकारिन. याविषयी कोशलाधीपिकडे
मी मुळीच याचना करणार नाही. याचे मी आपणास अभिवचन देतो.
११. सेनापती म्हणाला, " तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे. कारण, जरी तू
देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगन्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही
गोष्ट कोशलाधिपतीस समजनारच, आणि तो असाच निष्कर्ष काढेल की, ही
शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील.
१२. सिद्धार्थ गौतम म्हणाला, " हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो.
मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय.
१३. सेनापतीला वाटले की, हा एक चांगला मार्ग आहे. तथापि, सिद्धार्थाला हा मार्ग
कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती.
१४. म्हणून सेनापतीने सिद्धार्थला विचारले, " तुझ्या आई - वडिलांची आणि पत्नीची
संमती घेतल्यावाचून तुला परीव्राजक कसे होता येइल?
१५. आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थाने
त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला, " त्यांची संमती मिळो वां न मिळो,
हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो.
१६. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग
आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला.
१७. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तान्त सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी
बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता.
१८. कारण, घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की, त्याचे मातापिता रडत आहेत व ते
फार दुःखमग्न झाले आहेत.
१९. शुद्धोधन म्हणाला, " आम्ही युद्धाच्या दुष्परणामाची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत
जाशील हे मला कधीच वाटले नाही.
२०. सिद्धार्थाने उत्तर दिले, " मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते.
शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेल अशी मला आशा होती
२१. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की
माझ्या म्हण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही.
२२. तथापि, मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले
असेलच. सत्य आणि न्याय यांपासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी
पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतः वराच ओढवून घेण्यात
यशस्वी झालो.
२३. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, " आमचे काय होणार याचा तू विचारच
केला नाहीस. " पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले, सिद्धार्थाने उत्तर दिले.
शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला
असता याचा तर आपण विचार करा.
२४. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन आक्रंदून म्हणाला,
" सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्यबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये ?
२५. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, " हेच बरोबर
आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस ?
२६. सिद्धार्थ म्हणाला, आई तू शत्रियांची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस ?
हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन
मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय ?
२७. नाही! गौतमी उत्तरली, " ते मरण शत्रियाला साजेसे झाले असते, पण तू आता अरण्यात जात
आहेस. लोकांपासून अगदी दूर, हिंस्त्र पशुंच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने
कसे राहणार ? मी तुला सांगते , तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल.
२८. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ ? नंद अगदीच लहान मूल आहे . माझा पुत्र राहुल नुकताच
जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय ? सिद्धार्थाने गौतमीला विचारले.
२९. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की, आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून
कोशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कोशल देशात जाऊन राहू शकू.
३०. पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील ? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का
समजणार ? शिवाय माझ्या परीव्रज्येचे कारण कोशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने
काहीही करणार नाही, असे मी वचन दिले आहे.
३१. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठले श्रेयस्कर ? अरण्यात
राहणे की कोलीयांच्या हत्येत सहभागी होणे?
३२. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे
बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तु येथे
संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे.
३३. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय
वाटते ?
३४. आपल्या भवणांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी तरी आणखी दुसरे
काय करू शकले असते. कोलियांविरुध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणें भागीदारिण झाले नसते.
३५. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे . माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे.
मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण, मला
राहुलचे संगोपन करावयाचे आहे.
३६. असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला
तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्रांविषयी आपण मुळीच काळजी करू नका
माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन.
३७. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक
असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ
माझी इच्छा आहे.
३८. याचा सिध्दार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे
याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत
आणि अश्या पत्नीचा व आपला वियोग देवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली.
त्याने राहुलला आण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो
निघून गेला."Gautam Buddha"
३९. आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमी ने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला
आवडले नाही. कारण त्याला ठाउक होते की, दुःखा वेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत.
परंतु ती त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोहचली होती.
४०. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले.
४१. आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्यांचा आशीर्वाद मागितला.
त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की, त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता.
त्यांनी रड रडून कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले.
४२. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला व छत्र जेथे उभा होता तेथे गेला.
त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले.
४३. त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलतभाऊ महानाम याने
परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले.
४४. अशाप्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्व तयारी करून सिध्दार्थ परिव्रज्येची
दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला.
४५. भारद्वाजाने आपल्या सिष्यांच्या साहाय्याने आवश्यक तो संस्काविधी केला आणि सिद्धार्थ गौतम
परिव्राज झाल्याचे जाहीर केले.
४६. परिव्रज्या घेण्याची व विलंब न लावता शाक्य राजाच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या
समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रज्येचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या
प्रवासाला निघाला.
४७. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला.
४८. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले.
४९. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमी ला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या
एका तळ्यात टाकली.
५०. परिव्रज्या ( संन्यास ) ग्रहण करण्याच्या वेळी
सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते.
या कारणांमुळे सिद्धार्थ गौतम ने आपले सर्व धन,सुखसंपत्ती, व राजमहाल सोडले.
0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.