भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय ?
22 June 2023
ईश्र्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले ? हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला ' प्रजापती ' , ' ईश्वर ' , ' बह्म ' ' महाब्रह्म ' इत्यादी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही. जे लोक ईश्र्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर, शिव ( चांगला, कल्याणकारी ) न्यायी आणि दयाळू आहे.
भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय ?
उत्तर आहे, ' नाही ' त्याने स्वीकार केलेला नाही."
![]() |
Social media |
अशी अनेक कारणे आहेत की, ज्यांसाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धान्त मान्य केला नाही.
कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे.
कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की, ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे.
ईश्र्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे ? काहीही लाभ नाही.
भगवान बुद्ध म्हणतो की, ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रीत धर्म आहेत. म्हणून ईश्र्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने या प्रश्नाला विविध पैलुंचा विचार केला आहे.
ज्या कारणांस्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धान्त अमान्य केला आहे ती अनेक आहेत.
त्याने असा विचार मांडला आहे की, ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धान्त हा सत्यावर आधारलेला नाही.
हा विचार त्याने वासेट्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे.
वासेट्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला.
या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कोशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकद नावाच्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवणात ते थांबले होते.
वासेट्ठ आणि भारद्वाज दोघेही मनसाकद गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की, तथागत त्यांच्या गावी उतरले आहेत.
तेव्हा ते त्यांच्याकडे गेले. आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला.
भारद्वाज म्हणाला, " तरुकख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तिचा मार्ग आहे, आणि जो कोणी त्या
मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो.
वासेट्ठ बोलला, " हे गौतम ! पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अध्वर्यू ब्राह्मण, तैतिरिय ब्राह्मण, कंछोक ब्राह्मण,
त्याचप्रमाणे भीहूवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येक जण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात.
ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहचवितात.
त्याप्रमाणेच या ब्राह्मणांनी दाखविलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात.
भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासेट्ठ, तुझे म्हणणे असे आहे काय ? की सर्वच मार्ग बरोबर आहेत ? वासेट्ठ बोलला,
श्रमण गौतम होय, हेच माझे म्हणणे आहे.
पण वासेट्ठ, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपेंकी एकाने ब्रह्माचे साक्षात् समोरासमोर दर्शन घेतले आहे काय?
" नाही, गौतम नाही.
" कोणीही ब्रह्म पाहिलेला नाही, कोणालाही ब्रह्मसाक्षात्कार झाला नाही. " वासेट्ठ बोलला, " होय, असेच आहे. " तर मग तू
असे कसे मानतोस की, हे ते ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे ?
वासेट्ठ, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधल्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही,
मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणे मला वाटते, ह्या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या
शब्दांसारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही. मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही. अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. ह्या ब्राह्मणांचे शब्द उपहास्पद आहेत, ते केवळ पोकळ, व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही.
वासेट्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय ? हो, तशीच आहे, " वासेट्ठ ने
उत्तर दिले.
वासेट्ठ मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस, आणि जिची तू वांछा
धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती शत्रीय जातीची आहे, की ब्राह्मण आहे, की वैश्य जातीची आहे, की शूद्र जातीची आहे?
सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्मा याच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासेट्ठ यांना उद्देशून
म्हणाला. " मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे,
सर्वद्रष्टा आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे, आणि जे
आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत.
याचा अर्थ असा की, जे आज आहेत आणि भविष्य काळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्म हा पिता आहे.
तुझे म्हणणे असे आहे की, " पूज्य, विजेता, अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक ज्यांच्यामुळे सर्वांची
उत्पत्ती झाली असा जो ब्रह्म, तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपवित्तर्नशील आहे. तो अनंत काळ असाच
राहणारा आहे, तर मग त्या ब्राह्मणे उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थाही, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी,
मरणधर्मी कसे झालो ?
ह्या प्रश्नाला वासेट्ठाजवळ उत्तर नव्हते.
तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्तेसंबंधी होता. " जर ईश्वर सर्वशक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला
काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे
मनुष्यप्राणी म्हणजे या जगातील कोणतीही कार्य ज्याला करावे लागत नाही, असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे,
तर ब्रह्माणाने माणसाला निर्माणच का केले?
यालाही वासेट्ठाजवळ उत्तर नव्हते.
भगवान बुद्ध
तथागताचा चवथा विचार असा होतो की, ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे, तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेशी, विकृत अशी का होतात ? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे ?
तथागताचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञात, न्ययीपणा, दयाळूपणा या संबंधात होता.
जर कोणी महान शृष्टिकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलवतो ? असा प्रश्न
तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, " ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाणे दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्म आपली रचना का
सुधारित नाही ? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल, तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पूढे का सरसावत
नाहीत ? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे. तो सर्वांना का सुख देत नाही ? अफरातफरी, चोरी,
अज्ञान का फैलावत राहते ? असत्य असत्यावर का मात करते ? स्त्या आणि न्याय पराभूत का होतात ? माझ्या मते, अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो.
' सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्यांच्याकडून पाप अथवा
पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर
तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. तथागताचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी शेवटचा
विचार असा होता की, ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही.
तथागतांच्या मते, धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही. ते माणसामाणसांच्या संबंधात आहे.
धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशारीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे.
तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरूद्ध असण्याची एक कारण होते.
तथागत धार्मिक क्रियाकलपाच्या विरोधी होते. याविरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे
आगरच असते, आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व सम्मादिठ्ठी तिचे शत्रू आहेत.
तथागताच्या दृष्टीने इश्र्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण इशवरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना
ह्यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहितपद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की,
तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिठ्ठीचा विकास अशक्य होतो.
ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधी हे विचार व्यवहारी होते पण ते बृहंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की, ते
विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते.
ह्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही,
हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की, निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली ? ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे
समर्थन हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे.
महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, ईश्वराने सृष्टी भाव ( काही पदार्थ ) यातून उत्पन्न केली की अभाव ( शून्य ) यातून निर्माण केली ?
" काही तरी " हे " काहीच नाही " मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही.
जर तथाकथित ईश्वराने ' काही तरी ' हे ' काही तरी ' मधून निर्मिले असे म्हटले तर, ज्या ' काही तरी ' तून जे नवे ' काही तरी '
निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या ' काही तरी ' चा
निर्माता म्हणता येणार नाही.
जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी ' कोणी तरी ' ' काही तरी ' निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही.
ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरूद्ध तथागताचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता.
ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे, हा विश्वास तर्कदृष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील
विश्वास ठरतो.
0 Comments
ही एक प्रायव्हेट website आहे.